बेळगाव / प्रतिनिधी
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय विद्यालय क्रमांक २ कॅम्प बेळगाव येथे शालेय स्तरावरील बालदिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय विद्यालय क्रमांक २ कॅम्पचे प्राचार्य एस. एस. राजा होते. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्राचार्य श्री. एस. एस. राजा आणि प्रभारी एच.एम. श्रीमती गीता मठपती यांनी सर्व विद्यार्थ्यांना समूह गीत, समूहनृत्य,अॅक्शन साँग, फॅन्सीड्रेस आणि मोनोअॅक्टिंग सारख्या विविध राज्ये, संस्कृती आणि नैतिक मूल्यांवरील विविध थीम आधारित उपक्रम आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन या दिवसाचा आनंद लुटला.
0 Comments