बेंगळूर / प्रतिनिधी
बेंगळूर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान कनकदास जयंतीनिमित्त आमदार निवासस्थानाच्या प्रांगणातील कनक दासांच्या भव्य मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी, विधान परिषदेचे सभापती रघुनाथ मलकापुरे, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments