बेंगळूर / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूर येथील संगोळळी रायण्णा रेल्वे स्थानकावर राज्याच्या बहुप्रतिक्षित कर्नाटक भारत गौरव काशी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून चालना दिली.
या आठ दिवसांच्या काशी दर्शन रेल्वेने वाराणसी, प्रयागराज,अयोध्या या पवित्र स्थळांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सदर यात्रा भारत सरकारच्या सहकार्याने धर्मादाय विभागाने आयोजित केली आहे. या यात्रेचा एकूण खर्च 20,000 रु. असून त्यात सरकारचे ५००० रुपयांचे अनुदान आहे. यात्रेदरम्यान यात्रेकरूंसाठी भोजन निवास आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कर्नाटक भारत गौरव काशी दर्शन या विशेष रेल्वेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला याचवेळी पंतप्रधान मोदींनी बेंगळूर - म्हैसूर चेन्नई 'वंदे भारत रेल्वेलाही' हिरवा झेंडा दाखवून चालना दिली.
यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय कायदा आणि संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या धर्मादाय हज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, खासदार पी.सी. मोहन,तेजस्वी सूर्या आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments