• आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन

सुळगा (हिं.) / वार्ताहर

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंजूर केलेल्या अनुदानातून बेळगाव ग्रामीण मतदार संघातील मण्णूर गावच्या एससी कॉलनीतील रस्त्यांच्या बांधकामाला प्रारंभ झाला आला. आज आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, संपूर्ण ग्रामीण मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. ग्रामीण मतदारसंघाचा 'न भूतो, न भविष्यती' अशा पद्धतीने विकास करण्यात आला आहे आणि यापुढेही अधिकाधिक विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, सरिता नाईक सचिता सांबरेकर, रामा चौगुले, जयवंत बाळेकुंद्री, जयश्री नाईक, कृष्णा देवरामणी, नारायण शहापूरकर, पद्मराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.