सुळगा (हिं.) / वार्ताहर
मतदारसंघात राबवलेल्या विकास कामांमुळेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघ हा राज्यात आदर्शवत बनला असल्याचे आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
आरळेकट्टी गावात महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभात त्या बोलत होत्या. मतदार संघातील प्रत्येक गावाला विविध प्रकारे अनुदान मंजूर करून विकास करण्यात आली आहेत. विकासाच्या बाबतीत ग्रामीण भाग कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये. यासाठी सर्व प्रकारची विकास कामे सुरू करण्याच्या सूचना संबंधित गावातील लोकप्रतिनिधींना मी देत आहे. तुमचे प्रेम,आपुलकी आणि आशीर्वादामुळेच नि:स्वार्थीपणे मतदार संघाची सेवा करत आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. प्रारंभी हळदी-कुंकू समारंभात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी आरळेकट्टीच्या ग्रामदैवतेचे दर्शन घेतले.
यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सी. सी. पाटील, सुरेश इटगी, जगदीश येळळूरकर, सिद्दण्णा शिंगाडी, गुराप्पा हेब्बाळकर, शंकर येळळूरकर, यांच्यासह ग्रामसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments