- अखेर आजही सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी सुनावणी नाही
नवी दिल्ली दि. 30 नोव्हेंबर :
बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. पण न्यायाधीश अन्य खंडपीठाच्या कामात व्यस्त असल्यामुळे सदर सुनावणी लांबणीवर पडली. त्यानंतर आज 30 नोव्हेंबर रोजी ही महत्वपूर्ण सुनावणी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाज याचिकेवर सूचित केले होते. मात्र या पीठावरील एक न्यायाधीश हजर राहणार नसल्याची माहिती मिळाली होती.
त्याचप्रमाणे केरळमधील जल्लीकट्टू या बैलगाड्यांच्या शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. या घटनापीठात सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन दाव्यातील एका न्यायमूर्तीचा समावेश आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीसंदर्भातील सुनावणी सोमवारपासून सुरू झाली असून ती मंगळवार दि. 29 नोव्हेंबर पर्यंत चालू होती. तसेच आज बुधवारी दुपारपर्यंत सुनावणी सुरू होती. दुपारी 1 वाजेपर्यंत सुनावणी संपली असती तर दुपारनंतर सीमा प्रश्नी सुनावणी सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. परंतु आजही सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नसंदर्भात सुनावणी होऊ शकली नाही. तेव्हा सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणती तारीख जाहीर होणार याकडे महाराष्ट्र- कर्नाटकासह सीमा भागातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments