बेळगाव : आसाममध्ये १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या पॅरा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या जलतरणपटूंनी उत्तम कामगिरी केली आहे. प्रशांत दडेदवर आणि राघवेंद्र अणवेकर अशी त्यांची नावे असून या स्पर्धेत प्रशांत दडेदवर याने एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले तर राघवेंद्र अणवेकर याने दोन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले आहे. दोन्ही जलतरणपटू दिव्यांग असून अळवण गल्ली, शहापूर येथील  फिजिकली हॅंडीकॅप्ड असोसिएशनचे प्रतिनिधी आहेत.