• हुबळी ग्रामीण पोलिसांची कारवाई 

हुबळी / वार्ताहर

बांधकामासाठी आणलेली लोखंडी रॉड चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात हुबळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

मारुती बसप्पा अधिकारी आणि पीरसाब मुबुसाब कोलकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे 85,000 किमतीचे लोखंडी रॉड आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.