- कुमार विद्यामंदिर बसर्गे शाळेचे आदर्शवत कार्य
चंदगड / लक्ष्मण यादव
यवतमाळ, बीड जिल्हयातील ऊस तोड मजूर टोळ्या बसर्गे गावाशेजारी आल्या आहेत. त्यामध्ये जवळपास १४ मुले १४ वर्ष वयोगटाखालील आहेत ,या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क,आनंदी बालपण मिळावे यासाठी त्यांना शाळेत आणण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी गेल्या चार दिवसात संबंधित टोळ्यांना संपर्क साधला व चर्चा केली . प्रथमतः टोळीतील पालकांचा विरोध झाला पण त्यांचे यशस्वी प्रबोधन व सुरक्षेची हमी शाळेने घेतल्याने व त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक् साहित्य उपलब्ध करुन देण्याचे ठरल्याने पालकांनी आज १० मुलांना शाळेत पाठवले व मुलेही आनंदाने आमच्या शाळेत आली. इतर मुले ही लवकरच दाखल होणार आहेत. या मुलांचे केस कापून घेणे ,नखे कापणे, स्वच्छता ही जबाबदारी शाळेने घेतली आहे.
सर्व मुलांचे खाऊ ,वहया ,पुस्तके,पेन,अंकलिपी व फुलं देऊन स्वागत करण्यात आले. जवळपास तीन ते चार महिने ही मुले आमच्या शाळेत आनंदाने शिकतील हा आमच्यासाठी ही आनंदाचा व अभिमानाचा क्षण असल्याचे शाळा व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.
0 Comments