• दुचाकीस्वार जखमी 

विजयपूर / वार्ताहर

भरधाव दुचाकीची धडक बसून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. विजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील कुंटोजी गावानजीक हा अपघात झाला.

निंगाप्पा हलप्पा कडगी (रा.चिक्कोडी) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. तर दुचाकीस्वार हणमंत निंगाप्पा मादार (रा.कवडीमट्टी) हा देखील अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणाची मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.