- रस्त्याची डागडुजी अन् नियमित बससेवेची मागणी
अथणी / वार्ताहर
नियमित बसफेऱ्या आणि रस्त्याची दुरावस्था दूर करून चांगला रस्ता करावा या मागणीसाठी आज रामतीर्थ गावातील शेकडो विद्यार्थ्यांनी अथणी-कोटलगी राज्य महामार्गावरील रामतीर्थ क्रॉसनजीक बसेसना रोखून धरत रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे गावापर्यंत बस येत नाहीत. रामतीर्थनगर क्रॉसवरच प्रवाशांना उतरवले जाते. विचारणा केली असता गावातील रस्ता खराब असल्याने बस गावापर्यंत नेता येत नसल्याचे कारण दिले जाते. त्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाणे अशक्य झाले असल्याचे सांगितले.
या आंदोलनात सहभागी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गजानन मंगसुळी म्हणाले, खराब झालेल्या रस्त्यांमुळे शहरातील विद्यार्थी आणि वृद्धांना त्रास होत असून रस्त्याची दुरावस्था व अनियमित बससेवमुळे नागरिक त्रस्त असताना स्थानिक आमदार गेले कुठे? नागरिकांच्या समस्यांची त्यांना जाणीव होतं नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
या आंदोलनात रामतीर्थनगर येथील नागरिक आणि अथणी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
0 Comments