विजयपूर / वार्ताहर
विजयपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. यानंतरच कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील हे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भाजप - 93, काँग्रेस - 65, जेडीएस - 25, आप - 19, एमआयएम - 4, केआर पक्ष - 3, जनता पार्टी - 3,एसडीपीआय - 3, समाज पार्टी - 2, बीएसपी -2 असे एकूण 358 अर्ज दाखल झाले. दि. 28 ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या 35 वॉर्ड साठी निवडणूक होणार आहे.
0 Comments