बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे "इंडिया इमर्जिंग ग्लोबल इकॉनोमिक पॉवर" या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विशेष व्याख्याता म्हणून मुद्देबिहाळ सरकारी पदवी महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.डी.नंदेप्पन्नवर हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर.डी .तेली यांच्या प्रास्ताविक आणि स्वागत भाषणाने झाली. पुष्पाअर्पना नंतर प्रमुख व्याख्याते डॉ.आर.डी.नंदेप्पन्नवर म्हणाले की, आजचा युग अर्थशास्त्राचा आहे. या युगामध्ये सक्षम बनण्यासाठी विद्यार्थी आपल्या अभ्यासा बरोबरीने आपल्या कौशल्याला प्राधान्य देऊन आपल्याला आत्मनिर्भर बनवले पाहिजे. कौशल्य बळावर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाचे नाव उंच होऊ शकेल.

अध्यक्षस्थाना वरून प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर यानी विद्यार्थ्यांना सरकारी कौशल्य योजना आत्मनिर्भर,मेक इन इंडिया आदि योजनांचा लाभ घ्यावा असे अव्हान केले .प्रा. अर्चना भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले . या वेळी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.