- खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी
- व्यापारातून मोठी उलाढाल
- विक्रेत्यांनी व्यक्त केले समाधान
गत
दोन वर्षात कोरोनाच्या
संकटामुळे प्रत्येक सण अत्यंत
साधेपणाने साजरे करण्यात आले
होते. मात्र कोरोनाचा
प्रादुर्भाव पूर्णपणे कमी
झाल्याने यंदा सर्व सण उत्सव
परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात
साजरे होत आहेत. गणेशोत्सव
नवरात्रोत्सवा पाठोपाठ हिंदू
धर्मातील महत्त्वाच्या
सणांपैकी एक असलेल्या दिवाळी
सणाला काल दि. 21 ऑक्टोबर
रोजी वसुबारसने प्रारंभ झाला
आहे.
खरंतर
दिवाळीपूर्वी 15 दिवस
अगोदर बाजारपेठ दिवाळीसाठी
सज्ज असते. शहरासह
उपनगरे आणि तालुक्याच्या
ग्रामीण भागातील नागरिकही
खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात
बेळगाव शहर बाजारपेठेत
येतात. मात्र
यंदा परतीच्या पावसामुळे
खरेदीवर परिणाम झाला असून
दिवाळीला प्रारंभ होऊन देखील
नागरिक अजूनही बाजारपेठेत
खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
दरम्यान पावसाने थोडी
उसंथ घेतल्याने आज शनिवारी
आठवडी बाजारा दिवशी खरेदीसाठी
मोठ्या संख्येने नागरिक
बाजारपेठेत दाखल होते.
शहराच्या मुख्य
बाजारपेठेतील मारुती गल्ली
,गणपत गल्ली ,कडोलकर
गल्ली, पांगुळ गल्ली
या भागात नागरिकांची गर्दी
होती. सोमवारी
होणाऱ्या नरकचतुर्दशी
लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर
पूजा साहित्य, रांगोळीचे
रंग, पणत्या,
तोरणे, आकाश
कंदील, लायटिंगच्या
माळा, फराळाचे
साहित्य, उटणे,
मिठाई इ.मोठ्या
प्रमाणात खरेदी झाल्याचे
पाहायला मिळाले.
कपडे,
इलेक्ट्रॉनिक वस्तूंची
खरेदी व गाड्यांचेही बुकिंग
दिवाळी
सणाचे औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक
वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात
खरेदी झाली, बलिप्रतिपदा
दिवाळी पाडवा या साडेतीन
मुहूर्तातील शुभ दिवशी नवीन
दुचाकी आणि चारचाकी वाहने
खरेदी करण्यासाठी आतापासूनच
शोरूममध्ये ग्राहकांची
बुकिंगसाठी गर्दी होती.
याशिवाय सोने-चांदीचे
दागिने खरेदी करण्यासाठी
सराफी पेढ्याही ग्राहकांच्या
गर्दीने फुलून गेल्या होत्या.
दिवाळी नंतर लागलीच
लग्नसराईला सुरुवात होते
यानिमित्ताने दिवाळीचे औचित्य
साधून नवीन कपडे खरेदीलाही
नागरिकांनी प्राधान्य
दिले.
एकंदरीतच
खरेदीच्या माध्यमातून मोठी
उलाढाल झाल्याने 'व्यापाऱ्यांनी'
समाधान व्यक्त केले.
0 Comments