• विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील घटना
  • आरोपींना कोल्हापुरातून अटक 

विजयपूर / वार्ताहर 

जन्मदात्या आईशी अनैतिक संबंध ठेवलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा तीन मुलांनी मिळून निर्घृण खून केला. विजापूर जिल्ह्यातील चडचण येथे शुक्रवारी ही घटना घडली. तुकाराम चव्हाण (वय 60) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तुकाराम चव्हाण (वय 60) आणि तंगेव्वा बंगारतळी (वय 45)यांचे दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. काल, शुक्रवारी घराच्या मागे  तुकारामला आई तंगेव्वासह झोपलेल्या अवस्थेत पाहून तंगेव्वाची मुले सदाशिव बंगारतळी, चिक्कू बंगारतळी, आणि सिद्दू बंगारतळी यांना राग अनावर झाला. त्यांनी तुकारामाला पकडून बेदम मारहाण केली. तीक्ष्ण हत्याराने त्याच्या डोक्यावर व अन्यत्र वार करून तुकारामचा खून केला आणि तेथून पलायन केले.

सदाशिव बंगारतळी, चिक्कू बंगारतळी, आणि सिद्दू बंगारतळी यांनी खुनानंतर महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे आश्रय घेतला होता. पोलिसांनी जाळे रचून त्यांना शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.