विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्यात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून काल रात्री ९.४७ वा.आणि आज पहाटे ४.४० च्या सुमारास भूकंप झाला.

विजयपूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, विजयपूरमध्ये सलग दोन वेळा भूकंप झाला आहे. दोन्ही वेळा भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.

विजयपूर जिल्ह्याच्या बसवण बागेवाडी तालुक्यातील मनगोळी गावात भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदवण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.