बेळगाव / प्रतिनिधी
शिवाजी नगर बेळगाव येथील शाळकरी विद्यार्थ्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. 19 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराच्या शिवाजी नगर 5 वा क्रॉस येथील प्रज्वल शिवानंद करिगार नावाच्या 16 वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. यानंतर त्याचा मृतदेह मुचंडी गावानजीक शिवारात फेकून देण्यात आला होता. ही घटना मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मृत प्रज्वलच्या कुटुंबियांसह शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांनी काल शनिवारी शहर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून या घटनेचा छडा लावून , आरोपींना अटक लवकरात लवकर अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.
यानंतर कॅम्प पोलिसांनी अज्ञात मारेकर्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, आणि एका आरोपीला अटक केली. लक्ष्मण यल्लाप्पा होसमनी (वय 19 रा.खनगांव बीके) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी लक्ष्मण याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.
0 Comments