- घटनेमुळे गावात खळबळ : नागरिकांत घबराट
कोगनोळी / वार्ताहर
निपाणी तालुक्यातील आप्पाचीवाडी येथे भरदिवसा घरफोडी झाली. शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर रोजी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार येथील हॉटेल व्यवसायिक आप्पासो दादू मेंथे यांच्या म्हाकवे रस्त्यावर असणाऱ्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. या वेळी घरातील पाच तोळे सोने रोख व रोख रक्कम लांबविली. तसेच घरातील अन्य साहित्य इतरत्र फेकून दिले होते.
दुपारी तीन वाजता घराचे दार मोडले असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. यानंतर लागलीच मेंथे यांना घटनेची माहिती देण्यात आली. घरी येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. तात्काळ निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भर दिवसा घरफोडी झाल्याने गावात खळबळ माजली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments