खानापूर /प्रतिनिधी   

खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. पुलावर ठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने बेळगाव - कुसमळी चोर्ला मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

याची जाणीव झाल्याने कुसमळी गावच्या भाजप युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, अनंत सावंत पंचायत राज्य प्रकोष्ट, सहसंचालक मनोज कारलेकर, विशाल पाटील, विनू कालेहोलकर, हणमंत देसाई, भैरव कालेलकर, रविराज पाटील, विलास गायकवाड राजूशेट्टी, विजय दळवी, श्रीधर पाटील, शिरीष, किरण देसाई, तसेच पोलीस खात्याचे श्री. बडगेर, कॉन्स्टेबल श्री. सनदी आदी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सर्वांच्‍या श्रमदानाने मलप्रभा नदीवरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात आला. मात्र याकडे खानापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे.