विजयपूर / वार्ताहर

नियंत्रण सुटल्याने दुचाकीची रस्त्यानजीक असलेल्या कठड्याला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. 

हणमंतप्पा सोमनाथ (वय 25, रा. मलगलदिन्नी ता.मुद्देबिहाळ; जि. विजयपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवक मलगलदिन्नीहून मुद्देबिहाळला जात असताना मुद्देबिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.