• शुक्रवारपासून नव्या दरवाढीची अंमलबजावणी
  • ग्राहकांच्या खिशाला कात्री!

कोल्हापूर दि. १८ऑक्टोबर :

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. गोकुळने दुधाचे दर वाढविले आहेत. म्हशीचे दूध सरासरी 2 रुपये तर गायीचे दूध सरासरी 3 रुपये महाग झाले आहे. गोकुळने गाय आणि म्हैस दूध खरेदी दर वाढविल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.

दिवाळी सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना शुक्रवारपासून नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

 -असे आहेत नवे दर-

 नव्या दराप्रमाणे आता म्हशीचे दूध खरेदी करताना प्रति लिटर 2 तर गाईचे दूध खरेदी करताना प्रति लिटर 3 रुपये मोजावे लागणार आहेत. दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर 47.50 पैसे तर गाईला प्रति लिटर 35 रु. दर मिळणार आहे. गेल्या दीड वर्षात 9 रुपयांची दूध दरवाढ नोंदवण्यात आली असून आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

दुसरीकडे  म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढ होण्यापूर्वी कोल्हापूर मध्ये म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर 60 रु. होता. तो आता 63 रुपये इतका झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत 30 रुपयांवरून 32 रुपये इतकी झाली आहे.