- राजीव गांधी फाऊंडेशनचे लायसन्स रद्द
नवी दिल्ली दि. २३ ऑक्टोबर
केंद्र सरकारने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मोदी सरकारकडून गांधी कुटुंबियांशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए (FCRA) परवाना रद्द करण्यात आला असून एफसीआरए (FCRA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
राजीव गांधी फाउंडेशनने चीनच्या दुतावासाकडून निधी स्वीकारल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक समिती २०२० मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्याच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. यात समितीत गृह मंत्रालय, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचे अधिकारी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FCRA लायसन्स रद्द करण्याची नोटिस राजीव गांधी फाऊंडेशनचे ऑफिस बिअरर यांना पाठवण्यात आली आहे.
0 Comments