• मराठा युवक संघातर्फे स्पर्धेचे आयोजन

बेळगाव / प्रतिनिधी 

कैलासवासी एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ मराठा युवक संघा (रजि) तर्फे भव्य अशी आंतर जिल्हा स्तरीय शालेय व महाविद्यालयीन रोलर स्केटिंग स्पर्धा. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी याच्या सहकार्या ने रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ६:३० वाजता मराठा कॉलनी हॉटेल पंचामृत च्या समोरील रोडवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्केटर्स(खेळाडू) यांनी सूर्यकांत हिंडलगेकर यांच्याशी 9449563393 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा . या स्पर्धेचा आढावा मिटिंगला अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, खजिनदार दिनकर घोरपडे, शिवाजीराव हांगिरकर, सुहास किल्लेकर, गणेश दड्डीकर नारायण किटवाडकर, श्रीकांत देसाई, नेताजी जाधव, शेखर हंडे, इत्यादी उपस्थित होते