- आगार व्यवस्थापक विजयकुमार कागवाडे यांचे प्रतिपादन
- हुक्केरी विभागात कर्मचाऱ्यांच्या मोफत नेत्र-आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
हुक्केरी / वार्ताहर
केएसआरटीसी परिवहन मंडळाच्या हुक्केरी विभागात आज चालक,ऑपरेटर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आगार व्यवस्थापक विजयकुमार कागवाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय कुमार कागवाडे म्हणाले, केएसआरटीसी परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे घेण्याची आवश्यकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज हुक्केरी विभागात हे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर वाहतूक नियंत्रक सुनील बोंगाळे यांनी परिवहन कर्मचाऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करून संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी आरोग्य आणि डोळ्यांचे संरक्षण आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी महावीर भोळे, बी. एल. पाटील, एम. एच. नदाफ, विनोद शिंगे, ए. एस. पाटील आणि परिवहनचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments