मडुरा माऊली मंदिर येथे दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संजू परब मित्र मंडळा तर्फे पंचक्रोशी तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्कृष्ट दर्जाचे चष्मे सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप सावंतवाडी कार्यकारणी सदस्य बाळू गावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाळू गावडे यांच्याशी 9403881825 या क्रमांकावर संपर्क साधावा.
0 Comments