महापालिकेसमोर केक कापून व्यक्त केला संताप
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन वर्ष उलटले तरी अद्यापही महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. तसेच निवडून आलेल्या नगरसेवकांनाही त्यांचे अधिकार प्राप्त झाले नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस, म. ए. समिती आणि अपक्ष नगरसेवकांनी मंगळवारी निवडणुकीच्या वर्षपूर्तीनिमित्त महापालिका कार्यालयासमोर केक कापून प्रतिकात्मक निषेध केला. तत्पूर्वी हे 27 नगरसेवक महापौर कक्षात केक कापण्यासाठी गेले असता. महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी आक्षेप घेत पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सर्व नगरसेवकांना कक्षा बाहेर काढले. त्यानंतर महापालिकेसमोर आज केक कापून निषेध करण्यात आला.
बेळगाव महापालिका निवडणूक होऊन वर्ष झाले तरीही नवनिर्वाचित नगरसेवकांना सभागृह उपलब्ध झालेले नाही. याच बरोबर शहराच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक देखील प्रलंबित आहे.
नगरसेवकांनाच अधिकार मिळाले नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या कोण सोडविणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
0 Comments