![]() |
[फोटो सौजन्य : श्री. यल्लाप्पा कलखांबकर, ग्रा. पं. सदस्य,सुळगा (उ.) ग्रामपंचायत] |
समस्यांचे निवारण करून गैरसोय होऊ नये यासाठी सुळगा (हिं.) ग्रा. पं. च्या वतीने गावात विविध विकास कामे राबवली जात आहेत. या अंतर्गत गावच्या प्रत्येक गल्लीत सिमेंटचे रस्ते बनविण्यात आले आहेत. त्याचबरोबर सुरळीत पाणीपुरवठाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीमार्फत कलखांबकर बाग येथे बोअरवेल मारण्यात आली.
यावेळी बोअरवेलचे पूजन ग्रा. पं. अध्यक्षा सौ.निर्मला यल्लाप्पा कलखांबकर, सौ.सावित्रीबाई यल्लाप्पा कदम, सौ. विमल गुरुनाथ कलखांबकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर श्री. शिवाजी नारायण कलखांबकर यांनी श्रीफळ वाढवले. यानंतर बोअरवेल खोदण्याच्या कामाला चालना देण्यात आली.
याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य श्री.भागाण्णा नरोटी, श्री. यल्लाप्पा सिद्धाप्पा कलखांबकर, श्री. मारुती पाटील, श्री. मारुती परमोजी, श्री.शट्टूप्पा (बाळू) पाटील, श्री. महादेव कंग्राळकर, श्री.शिवाजी कलखांबकर, श्री.गुरुनाथ कलखांबकर,श्री.भाऊ कलखांबकर, श्री.मारुती सांगावकर यांच्यासह गल्लीतील इतर महिला व पुरुष उपस्थित होते.
0 Comments