• अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 20

बेळगाव / प्रतिनिधी

केपीटीसील परीक्षा गैरप्रकारातील आणखीन तीन आरोपींना बेळगाव जिल्हा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 20 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिसांच्या पथकाने या प्रकरणातील 17 आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.

दरम्यान अक्षय दूंडाप्पा भंडारी (वय 33 रा.आरभावी), बसवराज रुद्रप्पा  दूंदनट्टी (वय 34, रा. बिरंगड्डी) व श्रीधर लक्काप्पा कट्टीकर (वय 22, रा. राजापूर) अशी आज अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता  न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.