येत्या शुक्रवारी असलेल्या गणेश विसर्जनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेकडून आज कपिलेश्वर येथील जुन्या श्री विसर्जन तलावाची युद्धपातळीवर सफाई मोहीम राबवली. बेळगावात काल मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे या तलावात सांडपाणी मिसळून पाणी प्रदूषित झाले होते. त्यामुळे अस्वच्छ पाण्यातच श्री विसर्जन करावे लागले. म्हणून गणेशभक्तांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत मनपाकडून आज कपिलेश्वर जुन्या तलावाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी तलावात साचलेले दूषित पाणी पंप लावून बाहेर काढण्यात आले.
0 Comments