हुक्केरी / वार्ताहर 

हुक्केरी शहर पोलीस स्थानकात निरीक्षक रफिक तहसीलदार यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. या माध्यमातून शहराने पुन्हा एकदा जातीय सलोखा जपला आहे.

 

काही वर्षांपूर्वी एका मुस्लिम नेत्याने हुक्केरी शहरातील जुन्या बस स्थानकात गणेशाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता. आता पोलीस स्थानकातच लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर भगवी शाल परिधान करून गणरायाची पूजा करत पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार यांनी पुन्हा एकदा सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले आहे.

पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार यांच्यासह सहकार्यांचे नागरिकातून कौतुक होत आहे.