• भक्तांनी जड अंतःकरणाने दिला बाप्पाला निरोप


बेळगाव / प्रतिनिधी

बुधवारी 31 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीला बाप्पांचे जल्लोषी वातावरणात स्वागत करुन प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी  गुरुवारी दीड दिवसाच्या गणपतींचे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला.

बेळगाव शहरातील विविध विसर्जन तलावांमध्ये दुपारपासून विसर्जनाला सुरुवात झाली. रात्री पर्यंत सवाद्य विसर्जन मिरवणूक काढून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. 

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून महानगरपालिकेने तयार करून दिलेल्या विसर्जन कुंडामध्येही अनेक गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.

आपल्या लाडक्या बाप्पासोबत सेल्फी काढत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाची संख्या कमी असल्याने भक्तांनी विधिवत पूजा व आरती करून लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.