बेळगाव : शहरातील प्रसिद्ध बिल्डर विजय भंडारी (वय 49 रा. खासबाग) बेळगाव यांचे सोमवारी सकाळी दीर्घकालीन आजाराने पुणे येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा , मुलगी, आई वडील असा परिवार आहे. भंडारी हे बेळगाव शहरातील नामवंत बिल्डर होते त्यांनी बेळगाव बिल्डर असोसिएशनचे सचिवपद आणि क्रेडाई बेळगावचे पद भूषवले होते. बेळगाव शहर परिसरात अनेक रेसिडेंटस आणि कंमर्सिअल वसवले आहेत त्यामुळे त्यांचा या क्षेत्रात लौकिक होता.अनेक सामाजिक संस्थाशी देखील ते जोडले गेले होते. सोमवारी सायंकाळी 5 खासबाग येथील रहात्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे.
0 Comments