•  सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा

 (फोटो सौजन्य : दीपक शिंत्रे, विजयपूर) 



विजयपूर / दिपक शिंत्रे 

सहकारी क्षेत्रात अनेक संस्था उभारण्यात येतात त्यापैकी काही लयास जातात तर काही संस्था नावलौकिक मिळवून प्रगतीच्या शिखरावर जाऊन पोहोचतात, त्यापैकी विजयपूरातील श्री शिवाजी महाराज सोसायटी ही एक आहे सोसायटीची प्रगतीची भरारी सहकारी क्षेत्रात अभिनास्पद असल्याचे मत माजी मंत्री. आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.



शहरातील राणी चन्नम्मा सांस्कृतिक भवना श्री शिवाजी महाराज सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करुन बोलताना ते पुढे म्हणाले, 25 वर्षा  पूर्वी  1997 साली विजयपूरातील मराठा समाजाच्या काही प्रमुखांनी मराठा समाजासह इतर समाजातील छोट्या व्यावसायिकांची आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व गरजू लोकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी महाराज सोसायटीच्या कारभारास सुरुवात केली.  आज सोसायटी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना विश्वासाहर्ता व पारदर्शकता कायम ठेवली आहे.



या प्रसंगी बोलताना माजी मंत्री व श्री सौहार्दा सहकारी संघाचे  अध्यक्ष अप्पासाहेब पटृणशेटी म्हणाले, फक्त लाभ मिळविण्याच्या उद्देश न ठेवता इतर सामाजिक कार्य करुन सोसायटीने सामाजिक बांधिलकीची जपवूनक केली आहे असे सांगितले.

परमपूज्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी, पूज्य श्री चन्नमल्लीकार्जुन स्वामीजी, ज्ञानयोग आश्रमाचे पूज्य श्री बसवलिंग स्वामीजी, व सदलगाचे शिवानंद मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजी यांचा सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाचा व्यासपीठावर विधानपरिषदेचे सदस्य हनमंत निराणी, विधानपरिषदेचे सदस्य सुनीलगौडा पाटील, समारंभाचे अध्यक्ष स्थान सोसायटीचे अध्यक्ष डॉ सदाशिव पवार यांनी भूषविले होते.

तर व्यासपीठावर जिल्हा सहकारी युनियनचे अध्यक्ष एम.एस.पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाचे सदस्य गुरुशांत निडोणी, उपनिबंधक चिदानंद निंबाळ, सहकारी खात्याचे निबंधक एस.जी. कुंभार, मराठा समाजाचे प्रमुख विजयकुमार चव्हाण, ज्योतीराम पवार, बी.बी. शिवाळकर, हरिभाऊ मोरे, अॅड. टी.बी. सुर्यवंशी, मधुकर भोसले, शिवाजीराव गायकवाड, डॉ. रविंद्र भोसले, संचालक मंडळाचे सदस्य शंकर कणसे, बी.टी. तरसे, महादेव पवार, संजय जंबुरे,  प्रविण कनबूर, रवि मदभावी, भारत देवकुळे, श्रीमती सरोजिनी निक्कम, श्रीमती अंबूताई जाधव,  मुख्य व्यवस्थापक संजय जाधव व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश बदामी व लक्ष्मण पवार यांनी केले.