• विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी केली निदर्शने
  • जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन



बेळगाव / प्रतिनिधी

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्यावतीने आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
तत्पूर्वी राणी चन्नम्मा सर्कल येथे काही काळ रास्ता रोको केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपी यासारखी अवजारे घेऊन जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील कुली कामगार सहभागी झाले होते.


नरेगा योजनेत किमान 200 दिवस काम द्यावे, उपकरणांच्या भाड्यात वाढ करावी, वाढीव वेतन देण्यात यावे, कायद्यानुसार मजुरीचे पैसे काम केल्यानंतर 15 दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन महिन्यातून एकदा वेतन दिले जात आहे. तसेच सरकारने तीन महिन्यांपासून उपकरणांचे भाडे देणे थांबले असून ते पुन्हा सुरू करावे व प्रतिदिन 25 रु. प्रमाणे भाडे देण्यात यावे, यासाठी सरकारने अनुदानात वाढ करावी, यासह विविध मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात या आशयाचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेया आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील 8 तालुक्यातून आलेले मजूर, यांचे नेते व इतर उपस्थित होते.