◾️खास नवरात्रौत्सवानिमित्त केलेय आयोजन
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) येथील सीमेदेव युवक मंडळाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे औचित्य साधून मंडळाच्यावतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मंडळाने दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वा. सीमेदेव नगर सुळगा (हिं.) येथे खास नवरात्रौत्सवानिमित्त खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रु. 5001/- व चषक, द्वितीय क्रमांकासाठी रु. 3001/- व चषक, तृतीय क्रमांकासाठी रु. 2001/- व चषक, चौथ्या क्रमांकासाठी रु. 1001/- व चषक, पाचव्या क्रमांकासाठी रु. 501/- व चषक अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी नावे नोंदवावीत. सायंकाळी 7 नंतर नाव नोंदणी केली जाणार नाही, डान्ससाठी इंटरनेटवर गाणे लावून देण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार नाही. तेव्हा स्पर्धकांनी स्वतः गाणी आणावयाची आहेत. स्पर्धेचे इतर नियम व अटी कार्यक्रमस्थळी सांगण्यात येतील असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे.
तरी इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
1.विनायक सुतार : 7624821102
2.गणेश येरम : 8105660042
3.राजन बेळगावकर : 7483750882
4.नागराज शिगेहळ्ळीकर : 9380544702
0 Comments