खानापूर / वार्ताहर 

खानापूर तालुक्याच्या हलशी गावातील एक तरुणी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. मात्र आज ती मृतावस्थेत आढळून आली. प्रणाली परशुराम गुरुव (वय 21) असे तिचे नाव आहे. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास मृत प्रणाली ही घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती पुन्हा घरी परतली नाही. याप्रकरणी नंदगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आज सकाळी तिचा मृतदेह हलशी येथील प्रदीप यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.


घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. त्यानंतर विहीरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.