![]() |
घटनास्थळी पेटलेल्या ट्रकच्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशामक दलाचे जवान |
चालकाचा ताबा सुटल्याने कापसाची वाहतूक ट्रकची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील बरडोल क्रॉस नजीक आज सकाळच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एक ट्रक चडचणहून म्हैसूरकडे कापूस भरून निघाला होता. या ट्रक मध्ये जवळपास 24 टन कापूस होता. ट्रक बरडोल क्रॉस नजीक आला असता. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकची झाडाला धडक बसली. यानंतर शॉर्टसर्किट होऊन ट्रकने पेट घेतला.
या घटनेची माहिती तात्काळ अग्निशामक दलाला देण्यात आली. यानंतर घटनास्थळी दाखल होत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. या घटनेत अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद चडचण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
0 Comments