हुबळी -धारवाड बायपासवरील घटना
हुबळी / वार्ताहर
ट्रक आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीन जण गंभीर जखमीझाल्याची घटना हुबळी– धारवाड बायपासजवळ घडली.बेळगावहून बेंगळुरूकडे जाणारी खासगी बस आणि बेंगळुरूकडून बेळगावकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
या दुर्घटनेत ट्रकमधील क्लिनर आणि खासगी बसमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.
0 Comments