पोलिस आयुक्तांच्या सहकाऱ्यांना सूचना
शहरातील श्रींच्या मिरवणूक मार्गांची केली पाहणी
बेळगाव / प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपला आहे. बेळगाव शहरात घरगुती गणेशोत्सवा बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवा दरम्यान उपनगरे, तालुक्याचा ग्रामीण भाग, नजीकचा चंदगड तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा तसेच गोवा राज्यातील नागरिक खरेदी व सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरात येत असतात.
याच पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता शहर पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक, काकतीवेस, गणपत गल्ली, कपिलेश्वर रोड या भागातील गणेश मिरवणूक मार्गांची पाहणी केली.
गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी पाहणी वेळी सहकाऱ्यांना केल्या.
0 Comments