चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली कार
हारुगेरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली घटना
अथणी / वार्ताहर
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेला उलटून झालेल्या अपघातात माजी उपमुख्यमंत्र्यांसह कारमधून प्रवास करणारे चार जण सुदैवाने बचावले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अथणीहून बेळगावकडे येत असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कारला हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली. त्या अपघातात माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह कारमधून प्रवास करणारे चौघेजण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने कार वर काढण्यात आली. अपघातात कार मध्ये अडकलेले लक्ष्मण सवदी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
0 Comments