विजयपूर / वार्ताहर
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे माध्यम प्रतिनिधी गुरुलिंग स्वामी होळळीमठ यांचे काल बेंगळूर येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. विजयपूर येथेही जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गुरुलिंग स्वामी होळळीमठ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश छुरी यांनी मनोगत व्यक्त केले.
या शोकसभेला प्रधान कार्यदर्शी मोहन कुलकर्णी, खजिनदार राहुल आपटे, ज्येष्ठ पत्रकार महेश षटगार, के. के. कुलकर्णी, माझी प्रधान कार्यदर्शी विनायक सोंडूर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
0 Comments