कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम 

कंग्राळी (बी. के) / वार्ताहर  

कंग्राळी बुद्रुक येथील स्मशानभूमी मध्ये गवत वाढल्याने नागरिकांना अंत्यसंस्काराकरिता समस्या निर्माण झाली होती. येथील मार्गावर रान वाढल्याने तसेच कचऱ्याचेही साम्राज्य पसरल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

तसेच रान मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने डासांची पैदास ही मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने स्मशान मध्ये मोठ्या प्रमाणात रान वाढले होते .त्यामुळे येथून जाताना अनेकांना त्रास उद्भवत होता .गावातील नागरिकांनी एकत्रित येत स्मशानभूमी मध्ये जमलेले रान बाजूला केले.

फक्त रानच नाहीतर स्मशान मध्ये जमलेला प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा गावातील नागरिकांनी एकत्रित येत बाजूला केला. तसेच गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमास दिलेल्या प्रतिसादाबद्दल यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील, सदस्य जयराम पाटील ,दादासाहेब बहद्दरगडे, नवनाथ पुजारी माजी ग्रामपंचायत चेअरमन गजानन पाटील,तानाजी पाटील,विजय पावशे, संजय कडोलकर, प्रशांत पवार,राजू चव्हाण,दीपक सुतार उपस्थित होते.