बेळगाव /प्रतिनिधी
येथील सांबरा विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी बहारदार अविष्कार सादर केला. बीई सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते आणि नृत्य यांचा सुरेख मिलाफ घडवून आणला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांबरा विमानतळाचे मुख्य अधिकारी राकेश कुमार मौर्य यांनी आपल्या भाषणात सांबरा विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेतला. बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे प्रतिनिधी आर. डी . जोशी यांच्या हस्ते राकेशकुमार मौर्य यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्य डॉ. सुचेता कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
0 Comments