बेळगावात क्रांती दिन गांभीर्याने

बेळगाव / प्रतिनिधी

ब्रिटीशांच्या उरात धडकी भरवलेल्या महात्मा गांधींच्या ‘छोडो भारत‘ आंदोलनाच्या स्मरणार्थ  ९ ऑगस्ट रोजी बेळगावात ऑगस्ट क्रांती दिन गांभीर्याने 

पाळण्यात आला. येथील किर्लोस्कर रोडवरील हुतात्मा चौक येथे कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक व वारसदार संघटनेच्या वतीने व इतर संघटनांच्या सहकार्याने ध्वजारोहण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना  जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष मदन बामणे म्हणाले की, 1942 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे भारतातील प्रत्येक खेडेगावातील लोक स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. या आंदोलनामुळे देशभरातील लोकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. यामुळे 9 ऑगस्ट या दिवशी दिलेले भारत छोडो आंदोलन हे भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे हा महत्त्वाचा दिवस 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघटनेचे संचालक गणाचारी, यावेळी म्हणाले की, 9 ऑगस्ट 1942 रोजी पुकारलेल्या चले जावं चळवळीची आठवण म्हणून बेळगावमध्ये आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. चलेजाव आंदोलनामुळे. बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी संपूर्ण देशातील जनतेला बोलावले. त्या संदेशाने 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झाले. यातूनच त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघटना व अन्य संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि देशभक्त नागरिक या कार्यक्रमात उपस्थित होते.