![]() |
(खानापुरात गोवा क्रॉस नजिक मुख्य रस्त्यावर कोसळलेले झाड) |
वाहनधारकांची गैरसोय, प्रवाशांतून संताप
खानापूर / वार्ताहर
सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटेच्या सुमारास खानापुरात गोवा क्रॉस नजीक मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने प्रवासी आणि वाहनधारकांची गैरसोय झाली. यावेळी प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोसळलेले झाड त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहनधारक आणि प्रवासी वर्गातून होत होती.
0 Comments