शिमोगा येथील प्रशिक्षित हत्ती रेसकोर्सच्या जंगलात दाखल
बेळगाव / प्रतिनिधी
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम गतिमान झाली आहे.रात्री 2:30 वाजता शिमोगा येथून प्रशिक्षित हत्ती (टस्कर) दाखल झाले आहेत. बुधवारी पहाटेपासूनच वनखाते आणि पोलीस खाते यांनी रेस कोर्स बंदोबस्तात वाढ केली असून रस्तेही बंद केले आहेत.
डॉ. विनय यांच्या नेतृत्वाखाली हत्तीचे पथक बेळगावमध्ये दाखल झाले असून 'अर्जुन' आणि 'आले' नावाचे हे दोन प्रशिक्षित हत्ती रेस कोर्स मैदानावर दाखल झाले आहेत. बुधवारी पहाटेपासून पोलीस आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी संयुक्तरित्या मोहीमेला प्रारंभ केला आहे.
0 Comments