कणकुंबी / वार्ताहर

गेल्या चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत. घाट मार्गातून प्रवास करणेही धोक्याचे बनले आहे. याच दरम्यान बेळगाव - पणजी मार्गावर चोर्ला घाटात कालमणी नजीक  भलीमोठी दोन झाडे उन्मळून पडल्याने रात्री दोन वाजल्यापासून    बेळगाव - गोवा वाहतूक ठप्प झाली.

झाडे हटवून वाहतूक सुरळीत झाली की नाही याबाबतची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.