विजयपूर / वार्ताहर
देवदर्शन घेऊन परतत असताना दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर दुचाकीवरील अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्याच्या तिकोटा तालुक्यातील ताजपुर गावानजीक दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. वरूण अगसर (वय 25 रा. मेहबूबनगर विजयपूर) असे अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे तर बसवराज अगसर (रा. मेहबूबनगर विजयपूर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वरुण व बसवराज हे दोघेही दुचाकीवरून अथणीला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन पुन्हा विजयपूरकडे परतत असताना तिकोटा तालुक्यातील ताजपूर येथे आले असता दुचाकी घसरून वरुणचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेची नोंद तिकोटा पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments