हुबळी / वार्ताहर

पुणे - बेंगळूर महामार्गावर हुबळी नजीक झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हुबळी नजीक जिगळूर गावाजवळ आज सकाळी भीषण दुर्घटना घडली.

बेंगळूरहून हुबळीकडे येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची रस्ते शेजारी असलेल्या दर्ग्याला जोरदार धडक बसली. या अपघातात कार मधील तिघेजण जागीच ठार झाले. या घटनेत पती-पत्नी आणि त्यांच्या जावयाचा जागीच मृत्यू झाला. हणमंतप्पा बेविनकट्टी, पत्नी रेणुका बेविनकट्टी, आणि जावई रवींद्र अशी मृतांची नावे आहेत. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

बेंगळूर येथे वास्तुशांती गृहप्रवेशाच्या कार्यक्रम आटोपून हुबळी ला परत येत असताना हा अपघात झाला. सर्व मृतदेह किम्स हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. या अपघाताची कुंदगोळ पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.