विजयपूर /प्रतिनिधी

विजयपूर जिल्ह्याच्या इंडी शहरातील उपनोंदणी कार्यालयात लोकायुक्त पोलिसांनी धाड घातली. सदर कार्यालयात खरेदी-विक्री संबंधित कामे करण्यासाठी जनतेकडून अनधिकृतपणे पैसे उकळले जात असल्याची तक्रार नागरिकांनी लोकायुक्त पोलिसांकडे केली होती.


या तक्रारीच्या आधारे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विजापूर लोकायुक्त पोलीस विभागाच्या एस. पी. अनिता यांच्यासह डीएसपी  अरुण नाईक, सीपीआय आनंद टक्कण्णावर, आनंद डोणी यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

 या कारवाईत उपनोंदणी कार्यालयातील अधिकारी महमद रफिक पटेल यांच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरू असून कागदपत्रांची ही तपासणी सुरू असल्याची माहिती लोकायुक्त पोलिसांनी दिली आहे.